Skip to main content

From Fragility to Force: Why Ray Dalio Sees India as a Structural Winner

आज जग एका मोठ्या बदलाच्या टप्प्यातून जात आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर तयार झालेली जागतिक व्यवस्था हळूहळू कमकुवत होत चालली आहे. देशांमधील सहकार्य कमी होत असून स्पर्धा वाढत आहे. अर्थव्यवस्था, राजकारण आणि तंत्रज्ञान या तिन्ही क्षेत्रांत एकाच वेळी मोठे बदल होत आहेत. अशा परिस्थितीत प्रसिद्ध गुंतवणूकदार Ray Dalio भारताच्या भवितव्याबद्दल सकारात्मक मत व्यक्त करतो, हे विशेष लक्षवेधी ठरते.

Bridgewater Associates चे संस्थापक असलेल्या Dalio यांच्या मते, इतिहास हा ठरावीक यांत्रिक पॅटर्न्सचा परिणाम असतो. राष्ट्रे कशी उगवतात, बहरतात आणि उतरती कळा कशी लागते हे समजून घेण्यासाठी त्यांनी पाच मूलभूत शक्तींचे फ्रेमवर्क मांडले आहे. या पाच शक्ती आज एकाच वेळी सक्रिय झाल्या असून, याच संयोगाच्या क्षणी भारत एका ‘Wonderful Arc’ मध्ये प्रवेश करत आहे.

Dalio यांचे भारताबाबतचे निरीक्षण थेट आणि स्पष्ट आहे. भारत आज अशा विकास टप्प्यावर आहे, जिथे “पुरेसे भांडवल नसण्यापासून भक्कम पायाभूत सुविधा उभारण्यापर्यंत”चा प्रवास सुरू आहे. तुलनेने कमी sovereign debt, तरुण व कुशल लोकसंख्या, वेगाने विस्तारत असलेली physical infrastructure (रस्ते, बंदरे, लॉजिस्टिक्स) आणि digital public infrastructure (UPI, Aadhaar, DPI stack) यामुळे भारताकडे पुढील दशकात सर्वात वेगवान growth rate देण्याची क्षमता आहे.

Dalio भारताला आजच्या चीनशी नव्हे, तर ३० वर्षांपूर्वीच्या चीनशी तुलना करतो. म्हणजेच भारताची सध्याची ‘actual power’ अजून मर्यादित असली, तरी growth potential प्रचंड आहे. तात्कालिक लोकप्रियतेपेक्षा दीर्घकालीन structural reforms वर भर देणारे नेतृत्व भारतासाठी अनुकूल आहे

Dalio’s 5 forces redefining global power of India

पहिली शक्ती: Debt and Money Cycle

जगभरात कर्जनिर्मिती उत्पन्नाच्या वेगापेक्षा जलद वाढत आहे. Excess liquidity, fiscal deficits आणि fiat currenciesवरील विश्वास कमी होण्याची प्रक्रिया सुरू आहे. अशा वातावरणात, तुलनेने नियंत्रित public debt आणि मजबूत domestic savings असलेली अर्थव्यवस्था अधिक स्थिर राहू शकते. भारत या निकषांवर तुलनेने चांगल्या स्थितीत आहे.

दुसरी शक्ती: अंतर्गत राजकीय सुव्यवस्था व अस्वस्थता

Dalio यांच्या मते, wealth gap वाढला की राजकीय ध्रुवीकरण वाढते. अनेक विकसित अर्थव्यवस्थांमध्ये “left vs right” संघर्ष तीव्र होत असताना, भारतात अजूनही broad-based aspiration economy दिसते जिथे growth मुळे सामाजिक स्थैर्य टिकून आहे

तिसरी शक्ती: आंतरराष्ट्रीय जागतिक व्यवस्था

१९४५ नंतर उभी राहिलेली बहुपक्षीय रचना United Nations आणि World Trade Organization सारख्या संस्थांवर आधारित आता निर्णायक टप्प्यावर आहे. नियमांपेक्षा शक्ती महत्त्वाची ठरत आहे. अशा वेळी strategic autonomy, multi-alignment आणि non-aligned व्यवहार करणारे देश तुलनेने अधिक फायदेशीर स्थितीत राहतात. भारताची परराष्ट्र नीती याच दिशेने विकसित झाली आहे

चौथी शक्ती: निसर्गाचे आघात

Climate change, floods, droughts आणि pandemics यांनी इतिहासात युद्धांपेक्षा मोठा परिणाम घडवला आहे. मात्र भारताने Covid-19 महामारीसारख्या कठीण काळातून शिकत, आरोग्य व्यवस्था, लसीकरण, पुरवठा साखळी आणि आर्थिक पुनरुज्जीवन या आघाड्यांवर अडथळे पार केले आणि पुढे जाण्याची क्षमता दाखवली आहे.
भारतासाठी हा धोका असला, तरी renewable energy, climate adaptation आणि green infrastructure मध्ये होणारी गुंतवणूक दीर्घकालीन संधीही निर्माण करते.

पाचवी शक्ती: तंत्रज्ञान आणि मानवी कल्पकता

Dalio याला थेट “technology war” म्हणतो. AI, semiconductors, डेटा आणि डिजिटल प्लॅटफॉर्म्स यात जो पुढे, तो आर्थिक व भू-राजकीयदृष्ट्या आघाडीवर. भारताची strength येथे manufacturing पेक्षा human capital, software, services आणि digital scale मध्ये आहे.

या सगळ्यांचा एकत्रित निष्कर्ष असा की जग सहकार्याच्या युगातून स्पर्धेच्या युगात प्रवेश करत आहे. Trade wars, tech wars आणि geopolitical influence wars हे त्याचे स्पष्ट संकेत आहेत. Dalio एका ऐतिहासिक निरीक्षणाकडेही लक्ष वेधतो मोठ्या संघर्षांमध्ये थेट सहभागी न होता, तटस्थ भूमिका राखणारे देश अनेकदा जास्त समृद्ध होतात, कारण विजेते आणि पराभूत दोघेही शेवटी कर्ज आणि विनाशाने थकलेले असतात.

याच पार्श्वभूमीवर जागतिक सत्तासंतुलन नव्याने घडत असताना, योग्य धोरण, संस्थात्मक मजबुती आणि भांडवली शिस्त राखली, तर भारत हा केवळ वेगाने वाढणारा देश न राहता, नव्या जागतिक व्यवस्थेतील निर्णायक शक्ती ठरू शकतो. Ray Dalio यांच्या नुसार इतिहास हा noise, speed किंवा short-term dominance ला महत्त्व देत नाही. India’s “Wonderful Arc” ही हमी नसून, एक window of opportunity आहे.

Leave a Reply